Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Belgaon › पार्लरला केसांवर ट्रिटमेंट करणे पडले महागात!

पार्लरला केसांवर ट्रिटमेंट करणे पडले महागात!

Published On: Mar 23 2018 6:12PM | Last Updated: Mar 23 2018 6:14PMबेंगळुरू: पुढारी ऑनलाईन

काही महिलांचा सर्वात जास्त आवडता विषय सौंदर्यप्रसाधने असतो तर त्यांचे आवडते ठिकाण म्हणजे ब्युटी पार्लर असते. सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला विविध उपाय, ट्रीटमेंट घेत असतात. कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या अशाच  एका महिला केस स्मूदनिंग करणे महागात पडले. 

बेंगळुरू शहरात राहणारी निशा बटाविया ही महिला जयनगर येथील एका पार्लरमध्ये २ ऑक्टोबर २०१६ रोजी केस स्मूदनिंग करण्यासाठी गेली होती. केस स्मूदनिंग केल्याच्या दिवशीच तिचे केस खराब झाले आणि तिन दिवसांत केस मोठ्या प्रमाणात गळायला लागले. यावर पुन्हा निशाने पार्लर गाठले.  तिथल्या स्टाफनी त्यांच्या केंसावर पुन्हा चांगली  ट्रिटमेंट केली जाईल असे आश्वासन दिले आणि असे पुन्हा होणार नाही, हे देखील सांगितले.

त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या केसांच्या ट्रिटमेंटसाठी लोरियल कंपनीचे स्पेशलिस्टला बोलवण्यात आले. त्यांनी निशा यांच्या केसांचे निरीक्षण केले. केस गळायचे थांबण्यासाठी लोरियल कंपनीच्या उत्पादनाद्वारे निशा यांच्या केसांवर ट्रिटमेंट केली. या ट्रिटमेंटनंतर केस गळायचे थांबण्याऐवजी जास्त गळण्यास सुरूवात झाली. पाच वेळा लोरियल कंपनीच्या उत्पनाद्वारे ट्रिटमेंट घेतल्यानंतर पार्लरमधील स्टाफने त्यांना केशांच्या डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला.

या झालेल्या सर्व प्रकारावर निशा यांनी थेट ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी लोरियल कंपनी आणि जयनगरमधील पार्लरविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणावर 15 महिन्यानंतर न्यायालयाने पार्लरला 31 हजार रुपयांचा दंड केला. तर लोरियल कंपनी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. 
Tag : beauty parlor, women, hair fall , salon , Karnataka