Wed, Apr 24, 2019 20:01होमपेज › Belgaon › बेळगावात 'मराठी' नेत्यांना आत्‍मचिंतनाची गरज; जनतेने कौल नाकारला

बेळगावात 'मराठी' नेत्यांना आत्‍मचिंतनाची गरज; जनतेने कौल नाकारला

Published On: May 15 2018 8:35AM | Last Updated: May 15 2018 1:53PMबेळगाव : पुढारी ऑनलाईन

कर्नाटक निवडणुकीतील संपूर्ण महाराष्‍ट्राचे लक्ष लागून असणार्‍या मराठी बहुल बेळगाव जिल्‍ह्यात महाराष्‍ट्र एकीकरण समितीला एकही जागा मिळवता आली नाही. जिल्‍ह्यातील १८ पैकी १० जागांवर काँग्रेसला तर ८ जागी भाजपला विजय मिळाला. तर समितीला पूर्वीच्या दोन्‍ही जागा गमवाव्या लागल्या आहेत. 

महाराष्‍ट्र एकीकरण समितीतील दुफळीमुळे समितीचे नेतृत्‍व मतदारांनी नाकारल्याचे चित्र या निवडणुकीतून स्‍पष्‍ट झाले आहे. मराठी माणसांतील दुहीच या पराभवास जबाबदार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदारांनी राष्‍ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजपला जवळ केले. महाराष्‍ट्र एकीकरण समितीचे खानापूर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अरविंद पाटील यांना पराभव स्‍वीकारावा लागला आहे. 

निवडणुकीपूर्वी प्रयत्‍न होऊनही महाराष्‍ट्र एकीकरण समितीतील गटांमध्ये एकी झाली नाही. नेत्यांनी जनतेच्या मनातील एकीची इच्‍छा पूर्ण केली नाही त्यामुळेच जनतेने समितीच्या उमेदवारांना नाकारल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस आज (दि.१५) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. बेळगाव जिल्‍ह्यातील १८ मतदार संघाची मतमोजणी टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी कॉलेजमध्ये झाली. मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली. तसेच शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. 

अपडेट : 

बेळगाव ग्रामीणमधून काँग्रेच्या लक्ष्‍मी हेब्‍बाळकर ५० हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी

अथणीतून विद्यमान आमदार लक्ष्‍मण सवदी यांचा पराभव; महेश कुमठळ्‍ळी विजयी

खानापूरमधून काँग्रेसच्या अंजली निंबाळकर विजयी; महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्या अरविंद पाटील यांचा पराभव

बेळगाव : रायबाग मतदारसंघातून भाजपचे दुर्योधन ऐवळे विजयी

काँग्रेसचे रमेश जारकीहोळी गोकाकमधून तर सतीश जारकीहोळी यमकनमर्डीतून मतदार संघातून विजयी

कुडची मतदार संघातून विद्यमान आमदार पी. राजीव विजयी

रामदुर्गमधून भाजपचे महादेवप्‍पा यादवाड आघाडीवर

बेळगाव दक्षिणमधील भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी आघाडी घेत्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

हुक्‍केरीमधून भाजपचे विद्यमान आमदार उमेश कत्ती विजयी

बेळगाव उत्तरमधून भाजपचे अनिल बेनके विजयी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, एकही जागा जिंकता आलेली नाही

बेळगाव : काँग्रेसची १० जागांवर आघाडी, भाजप ७ तर महाराष्‍ट्र एकीकरण समिती १ ठिकाणी आघाडीवर

बेळगाव : जिल्‍ह्यातील १८ जागांपैकी ११ जागांवर भाजप, ६ ठिकाणी काँग्रेस तर खानापूरच्या एका जागेवर महाराष्‍ट्र एकीकरण समितीला आघाडी

बेळगाव ग्रामीण- काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर पुढे,  समितीचे मनोहर किणेकर पिछाडीवर

बेळगाव दक्षिण- समितीचे विद्यमान आमदार संभाजी पाटील रिंगणात नाहीत, समितीकडून मरगाळे उमेदवार ते पिछाडीवर, या मतदार संघात भाजपाचे अभय पाटील पुढे

खानापूर- समितीचे विद्यमान आमदार अरविंद पाटील आघाडीवर, काँग्रेसच्या अंजली निंबाळकर मागे

बेळगाव उत्तर- विद्यमान आमदार काँग्रेॉचे फिरोज शेठ मागे, समितीचे बाळासाहेब काकतकर मागे तर भाजपाचे अनिल बेनके आघाडीवर

बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील आघाडीवर. १५७८० मते. नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लक्ष्मीनारायण २२२२.

बेळगाव उत्तरमध्ये भाजपचे अनिल बेनके आघाडीवर. ३०८३० मते, नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे फिरोज सेठ १८३७० मते

बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर आघाडीवर ४११७ मते, नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे संजय पाटील २५९५.

खानापूर येथे महाराष्‍ट्र एकीकरण समितीचे अरविंद पाटील आघाडीवर, ४१११ मते, नजीकचे प्रतिस्पर्धी समितीचेच विलास बेळगावकर ३५६९.

बेळगाव : भाजप १०, काँग्रेस ६ तर महाराष्‍ट्र एकीकरण समिती एका ठिकाणी आघाडीवर

कागवाड मतदारसंघातून काँग्रेसचे श्रीमंत पाटील २ हजार मतांनी आघाडीवर

हुक्‍केरीमधून भाजपचे उमेश कत्ती आघाडीवर

बैलहोंगलमधून काँग्रेसचे महांतेश कौजलगी आघाडीवर

बेळगावमध्ये महाराष्‍ट्र एकीकरण समिती १, भाजप ९ आणि काँग्रेस ५ ठिकाणी आघाडीवर

महाराष्‍ट्र एकीकरण समितीचे अरविंद पाटील खानापूर मतदार संघातून आघाडीवर

बेळगाव : महाराष्‍ट्र एकीकरण १ जागी आघाडीवर, भाजप ६, काँग्रेसला ५ ठिकाणी आघाडी

अरभावी मतदार संघातून भाजपचे भालचंद्र जारकीहोळी ९ हजार मतांनी आघाडीवर

कित्तूरमधून भाजपचे महांतेश दोड्डगौडर २ हजार मतांनी आघाडीवर

बेळगाव निवडणूक निकाल : भाजप ६ तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर

बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील ३५०० मतांनी आघाडीवर

निपाणीतून भाजपच्या शशिकला जोल्‍ले आघाडीवर

बेळगाव उत्तरमधून भाजपचे अनिल बेनके २ हजार मतांनी आघाडीवर

बेळगाव ग्रामीणमधून काँग्रेसच्या लक्ष्‍मी हेब्‍बाळकर ३ हजार मतांनी आघाडीवर 

बेळगाव जिल्‍ह्यात भाजप ५ जागांवर तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर

बेळगावमधील अठरा जागांपैकी ३ ठिकाणी भाजप तर १ ठिकाणी काँग्रेस आघाडीवर

बेळगाव : तीन जागांवर काँग्रेस आघाडीवर; निपाणीतून काका पाटील, चिकोडी गणेश हुक्‍केरी, बेळगाव ग्रामीण लक्ष्‍मी हेब्‍बाळकरबेळगाव : तीन जागांवर काँग्रेस आघाडीवर; निपाणीतून काका पाटील, चिकोडी गणेश हुक्‍केरी, बेळगाव ग्रामीण लक्ष्‍मी हेब्‍बाळकर

दरम्यान, जिल्‍ह्यात ७६.१८ टक्‍के मतदान झाले आहे. शहरात मतदानाला कमी प्रतिसाद मिळाला होता. तर ग्रामीण भागात मतदानाची टक्‍केवारी अधिक राहिली आहे.

Tags : karnataka election, BJP, congres, JDS, kumaraswamy, narendra modi, rahul gandhi, siddaramaiah, yeddyurappa, maharashtra ekikaran samiti, marathi, nipani