Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Belgaon › ‘आरोग्य कर्नाटक’ ठरणार ‘संजीवनी’

‘आरोग्य कर्नाटक’ ठरणार ‘संजीवनी’

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 17 2018 11:20PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्य कर्नाटक योजना जाहीर केली आहे. याचा लाभ राज्यातील 1.4 कोटी कुटुंबियांना होणार आहे. जनतेसाठी ही घोषणा संजीवनी ठरणार आहे. 

सदर योजनेची घोषणा मागील अर्थसंकल्पात केली होती.त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी योजना जाहीर केली. मंत्रिमंडळात ऑगस्ट 2017 मध्ये मंजुरी देण्यात आली.  परंतु, याबाबत रुपरेषा ठरवून या अर्थसंकल्पात त्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. अर्थसंकल्पात आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्यासाठी 6,645 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
योजनेतून सर्व सरकारी इस्पितळात मोफत उपचार केले जाणार आहेत. यामध्ये पूर्वी कार्यरत असणार्‍या सात योजना विलिन केल्या आहेत. याचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे.

आरोग्य कर्नाटक योजनेचे लाभार्थी
योजनेचा लाभ राज्यातील 1.4 कोटी कुटुंबाना होणार आहे. यामध्ये दोन विभाग असून पहिल्या विभागात शेतकरी, असंघटित कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मागासवर्गीय, माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, समाजसेवक, स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. उर्वरितांचा दुसर्‍या गटात समावेश आहे. पहिल्या गटातील कुटुंबियांनी विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. मात्र दुसर्‍या गटातील कुटुंबाला योजनेचा लाभ घेण्यासाठी विमा हप्ता भरणे आवश्यक आहे.