Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Belgaon › ढोणेवाडी पिकअप शेड बनले मद्यपींचा अड्डा

ढोणेवाडी पिकअप शेड बनले मद्यपींचा अड्डा

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:58PM

बुकमार्क करा

कारदगा : वार्ताहर

ढोणेवाडी येथे प्रवाशांना बसण्यासाठी बांधण्यात आलेले पिकअप शेड निरुपयोगी बनले असून प्रवाशांपेक्षा मद्यपींना सोयीचे झाल्याने शेडला मद्यपींचा अड्डा म्हणून आता ओळखले जात आहे. शेडमधील घाणीचे साम्राज्य आणि देशीविदेशी दारुंच्या बाटल्यांचा खच पडल्याने याकडे ग्रा.पं. लक्ष देणार का केवळ बघण्याची भूमिका घेणार, असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे. 

एसटी स्टॅन्डच्या पूर्व बाजूस पीकअप शेडची निर्मिती केली आहे. प्रवासी आणि बसेस जाण्याचा मार्ग दुसरीकडे असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने पीकअप शेड म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा झाला आहे. प्रवाशांनी बस शेडचा वापर करणे बंद केल्याने याचा फायदा आता मद्यपींना झाला आहे. रात्र झाली की मद्यपी पीकअप शेडचा असरा घेऊन तेथेच ठिय्या मांडत आहेत. अशा गैरप्रकारांना ग्रामपंचायतीने आळा घालावा, अशी मागणी होत आहे.