Mon, Apr 22, 2019 12:37होमपेज › Belgaon › जोल्‍लेंच्या विजयाने ग्रामीण भागातही जल्‍लोष

जोल्‍लेंच्या विजयाने ग्रामीण भागातही जल्‍लोष

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:19AMबेडकीहाळ : वार्ताहर

निपाणी मतदारसंघाच्या निवडणुकीत आ. शशिकला जोल्‍ले यांनी विजय संपादन केला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्‍लोष केला. ग्रामदैवत सिध्देश्‍वराचे दर्शन घेऊन गावातील प्रमुख मार्गावरून विजय मिरवणूक काढण्यात आली.

सौंदलग्यात विजयोत्सव

निपाणी मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून प्रमुख मार्गावरुन विजयाच्या घोषणा देत फेरी काढली. झेंडा चौकात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष दादू कांबळे, संजय शिंत्रे, आप्पासो ढवणे, एस. एस. ढवणे, रघुनाथ चौगुले, आनंदा सुरवशे, गणपती गाडीवड्डर, कांतीनाथ चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे साहाय्यक फौजदार एम. आर. हंची, हवालदार बी. जी. करगार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

कोगनोळीत जल्‍लोष

जोल्‍ले यांच्या विजयाची बातमी समजताच कोगनोळीसह परिसरातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करीत एकच जल्‍लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत गावातून दुचाकी रॅली काढण्यात आली. आ. जोल्‍लेंच्या विजयासह जोतीबाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

गळतगा परिसरात जल्‍लोष

गळतगासह भीमापूरवाडी, ममदापूर परिसरात आ. जोल्‍लेंच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्‍लोष करत आनंदोत्सव साजरा केला.आ. जोल्‍ले यांच्या विजयाची वार्ता समजताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. गावातून विजय मिरवणूक काढून आ. जोल्‍लेंच्या जयाच्या घोषणा दिल्या. गुलालाच्या उधळणीत कार्यकर्ते न्हाऊन निघाले होते. कार्यकर्त्यांनी जल्‍लोष करीत हातामध्ये भाजप ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला.

कारदगा, ढोणेवाडीत आनंदोत्सव

कारदगासह ढोणेवाडीत आनंदोत्सव साजरा झाला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत गावातून विजय फेरी काढली. यावेळी जनार्दन घाटगे, शिवाजी खोत, दिलीप कांबळे, तुकाराम माळी, रावसाहेब दुगाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.