होमपेज › Belgaon › बेळगाव : जमखंडीचे काँग्रेस आमदार अपघातात ठार

बेळगाव : जमखंडीचे काँग्रेस आमदार अपघातात ठार

Published On: May 28 2018 10:57AM | Last Updated: May 28 2018 10:57AMबेळगाव : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २०१८ मध्ये ६९ वर्षीय काँग्रेस आमदार व बागलकोटचे माजी खासदार सिद्दू भीमप्पा न्यामगौडा हे जमखंडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. न्‍यामगौडा हे गोव्याहून परत येत असताना हा अपघात झाला आहे.

तुळसीगेरी (बागलकोट) परिसरातील कडलगी गावाजवळ सकाळी पहाटे झालेल्या एका अपघातात त्‍यांचे निधन झाले. त्यांच्या कारचा  डाव्या बाजूचा टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला असणार्‍या संरक्षण भिंतीला कार धडकली.
जिल्हा पोलीस अधीक्षक वामशिकुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की कार धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व तीन मुली असा परिवार आहे. १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी निवडून आलेल्या ७८ आमदारांपैकी ते एक होते. भाजपाचे कुलकर्णी श्रीकांत सुब्राओ यांच्या विरोधात २७९५ मतांच्या फरकाने ते विजयी झाले होते. २०१३ ची विधानसभा निवडणूकही त्यांनी जिंकली होती, तसेच पी. नरसिंहराव सरकारात ते केंद्रीय मंत्री होते.