Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › कर्नाटककडून निव्वळ धूळफेक

कर्नाटककडून निव्वळ धूळफेक

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 11:24PMजांबोटी : वार्ताहर

म्हादई लवाद आणि गोव्याच्या अवमान याचिकेच्या भीतीने कर्नाटक गोव्याच्या दिशेचा बांध फोडल्याचे स्पष्टीकरण देत आहे. यात कोणतेही तथ्य नाही. वरवर बांध फोडून कर्नाटक धूळफेक करत असल्याचा आरोप गोवा विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांनी  केला. 

म्हादई खोरे व कळसा प्रकल्प कामाची रविवारी पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाण्यासाठी कर्नाटकातील जनता राज्यभर आंदोलन करत असताना गोमंतकीय शांत आहेत. म्हादई बचाव आंदोलनासाठी गोवेकरांनी आता पेटून न उठल्यास गोव्यातील अनेक गोष्टींचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका आहे.