Mon, May 27, 2019 07:26होमपेज › Belgaon › पतीच्या खूनप्रकरणी पत्नी, मैत्रिणीस जन्मठेप

पतीच्या खूनप्रकरणी पत्नी, मैत्रिणीस जन्मठेप

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:11PM

बुकमार्क करा
जमखंडी : वार्ताहर

पतीच्या खूनप्रकरणी पत्नी व तिच्या मैत्रिणीस जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. मुधोळ येथील सिद्रामेश्‍वर वसाहतीत 14 ऑक्टोबर 2016 रोजी विवेक महरवाडी यांचा खून झाला होता. त्याची पत्नी शिल्पा व मैत्रीण  गंगा शेट्टेर यांनी विवेकला विष पाजून नंतर साडीने गळा आळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी जमखंडीतील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश न्या.  जी.  एम. शिनाप्पा यांनी दोघी आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड तसेच साक्षी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 7 वर्षे शिक्षा व 25 हजार रुपये दंड, मयताच्या मातेस प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्याची शिक्षा ठोठावली.

मयत विवेक महरवाडी हा हरिहरचा असून त्याने मुधोळ नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात तेलाचे दुकान चालविले होते. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. व्ही. बी. हबसू यांनी पाहिले. मुधोळ पीएसआय संतोष हळ्ळूर, सीपीआय एस. एम. कांबळे, डीएसपी रामनगौडा हट्टी यांनी खुनाचा तपास केला.