Tue, Jul 23, 2019 02:00होमपेज › Belgaon › सूचना फलक केवळ कानडीत

सूचना फलक केवळ कानडीत

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 09 2018 9:40PMबेळगाव : प्रतिनिधी

मण्णूर येथे दुर्घटना घडलेल्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर दुसरी  जुनी खाण आहे. तेथे भूगर्भ खात्याने सूचनाफलक उभारला आहे. तो केवळ कानडी आणि इंग्रजी भाषेतून आहे. मराठीतून सूचना नसल्यामुळे स्थानिकांना त्याचा अर्थबोध होत नाही.

केवळ मराठीचा दुस्वास करण्यासाठी भूगर्भ खात्याने सूचना फलकावरून मराठीला डावलले आहे. यामुळे नागरिकांची गोची होत आहे. मण्णूर, आंबेवाडी, गोजगा हा भाग संपूर्णपणे मराठी आहे. स्थानिक नागरिकांना समजेल अशा भाषेत फलक लावणे अत्यावश्यक आहे. 

केवळ मराठी भाषेला डावलण्याच्या अट्टाहासातून असे प्रकार प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र भाषेचा दुरभिमान न बाळगता त्या फलकाचा वापर स्थानिकांना होण्यासाठी स्थानिक भाषेतून फलक उभे करण्याची गरज आहे. केवळ कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यासाठी उभे केलेले फलक निरुपयोगी ठरत आहेत. कानडीबरोबरच मराठीतूनही सूचना फलक उभारावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.