Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Belgaon › बेळगावात 6पैकी एकच इंदिरा कँटिन सुरू

बेळगावात 6पैकी एकच इंदिरा कँटिन सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

‘स्वत:त मस्त आहार’ अशी ओळख करून दिलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी इंदिरा कँटिन योजनेला बंगळूरसह अन्य  भागात चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.  बेळगाव शहरासाठी सहा इंदिरा कँटिन मंजूर झाली असून भाजी मार्केट परिसरात सध्या एकच कँटिन सुरू आहे. उर्वरित 5 इंदिरा कँटिन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

इंदिरा कँटिन देखभालीचा खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेने निभावावा, असा राज्य सरकारचा आदेश असल्याने बेळगावातील इंदिरा कँटिन देखभालीची जबाबदारी महानरपालिकेवर असणार आहे.
भाजी मार्केट परिसरातील इंदिरा कँटिनचे उद्घाटन दि.12 रोजी करण्यात आले.  या कँटिनमध्ये 5 रु.ला नाश्ता व 10 रु.जेवण उपलब्ध होते.यामुळे  गोरगरीब कुटुंबे, मोलमजुरी करणारे, हमाल कामगारांची चांगली सोय झाली आहे. रुक्मिणीनगर, जिल्हा इस्पितळ, एपीएमसी रोड, गोवावेस व बॅ.नाथ पै चौक अशा 5 ठिकाणी इंदिरा कँटिन मंजूर झाली आहेत. मात्र निवडणूक आचारसंहिता  जारी झाल्याने या कँटिनचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. 

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  मेच्या अखेरीस किंवा  जूनच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित इंदिरा कँटिनचे उद्घाटन होईल, असा अंदाज आहे.


  •