Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Belgaon › ‘त्रिशंकू’ आल्यास आम्ही काँग्रेससोबत : देवेगौडा 

‘त्रिशंकू’ आल्यास आम्ही काँग्रेससोबत : देवेगौडा 

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 9:01PMअंकली : प्रतिनिधी 

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे. सत्ताधारी काँग्रेसने सभांचा धडाका लावलेला असून, राहुल गांधी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भाजपकडून अमित शहा प्रचारात सक्रिय झालेत. परंतु कौल त्रिशंकू येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तशी स्थिती उद्भवल्यास आम्ही काँग्रेससोबत राहू, असे सूचक वक्तव्य एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे.

पाच वर्षात भाजपने तीन मुख्यमंत्री बदलले. कर्नाटकसाठी भाजपचे हे योगदान आहे. परंतु पाच वर्षात काँग्रेसने एकच मुख्यमंत्री ठेवला. त्यांनी सरकारी नोकरदारांसाठी काय केल पाहा. मी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्याने माझ्यावर टीकाही करण्यात आली, असे देवेगौडा म्हणाले. 

आम्ही धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे असून कधीही भावनिक राजकारण केले नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा डी. जी. रामलिंगम यांना विचारणा केली होती की, पोलिस विभागात मुस्लिम हवालदार किती आहेत, तेव्हा त्यांनी फक्त 0.01 टक्के असे सांगितले. माणुसकीमुळेच मला आरक्षण मिळाले आहे, असेही देवेगौडा म्हणाले.