Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Belgaon › महामार्गावरील गावांची ओळख हरवली!

महामार्गावरील गावांची ओळख हरवली!

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 8:43PMखानापूर : वासुदेव चौगुले

बेळगाव-गोवा महामार्गावरील अनेक गावांचे नामफलक मोडून पडल्याने गावांची ओळखच नाहिशी झाली आहे. पणजी महामार्गाचे रुंदीकरण होणार असल्याने त्यावेळी रस्तेविषयक सुविधांचा विकास केला जाणार असल्याने महामार्ग प्राधिकरणाकडून नामफलकांसह दिशा व माहितीदर्शक फलकांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गासह जत-जांबोटी, बिडी-बेळवणकी, नंदगड-ताळगुप्पा, पिरनवाडी-चोर्ला, खानापूर-हेम्माडगा या राज्य महामार्गावर अनेक गावे आहेत. या गावांच्या ठिकाणी रस्त्यावर  नामफलक उभारण्यात आले होते. मात्र कालांतराने त्यांची पडझड झाली असून वेशीत केवळ पडक्या फलकांचे अवशेष आहेत.

बेळगाव-पणजी रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आहे. चौपदरीकरणात महामार्गावर असणार्‍या गावांचे नामफलक, निवारा, दिशादर्शक फलकांचीही नव्याने उभारणी केली जाणार आहे.