Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Belgaon › हुबळी-मुंबई विमानसेवा सुरू

हुबळी-मुंबई विमानसेवा सुरू

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:25AM

बुकमार्क करा

हुबळी ः प्रतिनिधी

भारतीय विमान प्राधिकारणातर्फे हुबळी येथील विमानतळाचे 142 कोटी रू.खर्च करून विस्तारीकरण करण्यात आल्यानंतर या ठिकाणाहून बंगळूर, हुबळी ते मुंबई अशा विमान सेवेचा शुभारंभ केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री अशोक गजपती राजु यांच्याहस्ते करण्यात आला. गेल्या काही महिन्यापासून लांब पल्ल्याच्या ठिकाणी विमान उड्डाणासाठी प्रयत्न करत असलेल्या हुबळी विमानतळाचे उदघाटन करण्यात आले असून 3600 चौ.मी.जागेमध्ये हवा नियंत्रण टर्मिनल इमारत उभा करण्यात आली आहे. एकूण तीन विभागामध्ये विमाने उतरण्याची सोय करण्यात आली असून एअर इंडियाने आजपासून आपल्या विमान सेवेला प्रारंभ केला आहे. हुबळी-मुंबई अशी प्रत्येक मंगळवार, बुधवारी आणि शनिवारी एअर इंडियामार्फत विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, ना. आर. व्ही.देशपांडे, जिल्हा पालकमंत्री विनय कुलकर्णी, खा. प्रल्हाद जोशी, विरोधी पक्षनेते जगदीश  शट्टर आदी उपस्थित होते.