Wed, Nov 14, 2018 12:59होमपेज › Belgaon › हिंडलग्याजवळही लूटमारीचा प्रयत्न

हिंडलग्याजवळही लूटमारीचा प्रयत्न

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:17AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

रात्रपाळीचे काम संपवून घरी निघालेल्या पत्रकाराला कॅम्पमध्ये मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असतानाच अशीच घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर हिंडलग्याजवळ घडली आहे. प्रिंटिंगचे काम संपवून मण्णूरला जाणार्‍या कर्मचार्‍याला हिंडलगा -मण्णूर रस्त्यावर लुटण्याचा प्रयत्न झाला. 

हा कर्मचारी काम संपवून रात्री दीडच्या सुमारास दुचाकीवरून निघाला असता हिंडलगा रोड येथे काही जणांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. मात्र, लुटारूंची टोळी असल्याचा संशय आल्याने त्याने दुचाकी वेगाने हाकली. काही काळ त्या टोळीने कर्मचार्‍याचा पाठलागही केला. गावाजवळ आल्यानंतर ते माघारी फिरले.  मण्णूरला पोहोचल्यानंतर कर्मचार्‍याने हा प्रकार सहकार्‍यांना मोबाईलवरून सांगितला. मात्र, घटनेची नोंद पोलिसांत झालेली नाही. 

शहरातील काही भागात वाटमारीची प्रकरणे घडली आहेत. कॅम्प पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. तरीही लूटमारीच्या घटना घडत आहेत.