Wed, Jun 26, 2019 23:33होमपेज › Belgaon › उन्हामुळे ‘हेल्मेट’ सक्ती शिथिल?

उन्हामुळे ‘हेल्मेट’ सक्ती शिथिल?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची दखल घेत उत्तर विभागातील जिल्ह्यात पोलिस महानिरीक्षक  जे. आलोककुमार यांच्या आदेशानुसार हेल्मेटसक्ती सुरू झाली.  27 जानेवारीला सुरू झालेल्या या मोहिमेला दि. 26 मार्च रोजी दोन महिने उलटले. या दरम्यानच्या काळात विविध उपक्रम राबवून वाहनधारकांत जागृती केली. उन्हाच्या तीव्र झळांमुळे सक्ती शिथिल झाली का, असे विचारण्यात येत आहे. 

पोलिसांनी सवडीनुसार कारवाईही केली. मात्र दोन महिन्यात या मोहिमेचे फलित सांगायचे म्हटले तर ‘नव्याचे नऊ दिवस’ म्हणता येईल. राजधानी बंगळूरनंतर धारवाड, बेळगाव येथेही हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली. मात्र बंगळूर वगळता अन्यत्र सक्ती केवळ फार्सच ठरली आहे. जिल्ह्यात गेल्या 20 वर्षात अनेकवेळा सक्ती केली. मात्र काही दिवसानंतर ती आपोआप विरली आहे. 

बार असोसिएशननेही जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन हेल्मेट सक्ती शहरांतर्गत करू नका, अशी विनंती केली होती. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. 21 फेब्रुवारीपासून पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, वाहतूक पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी, वाहतूक एसीपी महांतप्पा मुप्पीनमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलपंप मालकांची बैठक घेऊन शहर व उपनगरातील पेट्रोलपंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ अशी मोहीम राबविली. यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून विना हेल्मेट वाहनधारकांवर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र अद्याप हालचाली नाहीत. जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे जनतेत जागृती करण्यासाठी ‘माय हेल्मेट माय लाईफ’ हा लघुपट शाळा-महाविद्यालयात दाखवून प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही हेल्मेट वापरण्याकडे दुचाकीस्वारांचा कानाडोळा आहे.


  •