Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Belgaon › संततधारेला उसंत; पण बेळगाव चिंब

संततधारेला उसंत; पण बेळगाव चिंब

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 12:46AMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून बेळगाव परिसरात सुरू असलेल्या पावसाची संततधार मंगळवारी काहीशी थांबली; पण नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे परिसर चिंब झाला आहे. शहरातील मराठा कॉलनीतील अनेक अपार्टमेंटमध्ये, तर  मंगळवारी सायंकाळीही दीड फूट पाणी साचले होते. तीन दिवस पाऊस सतत सुरू होता. मंगळवारी मात्र पावसाने थोडी उसंत घेतली. दुपारी तर काही काळ सूर्यदर्शनही झाले. सकाळी आणि सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले होते. मराठा कॉलनी परिसरात नाल्याचे पाणी बाहेर आल्याने अपार्टमेंटमध्ये शिरले होते.

गेल्या चोवीस तासात बेळगाव परिसरात 40 मिमी पाऊस बरसला आहे. सोमवारचा पाऊस हा जवळपास अतिवृष्टीच होता. तर राकसकोप आणि उचगावात गेले सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

राकसकोपमध्ये चोवीस तासात 74.7 तर उचगावात 64.4 मी. मी. पाऊस झाला. चोवीस तासात 60 मी. मी. हून अधिक पाऊस झाल्यास त्याची अतिवृष्टी म्हणून नोंद होते.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत खानापूर तालुक्यात सर्वाधिक 51 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रामदुर्ग तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ 1.6 मी. मी. इतका पाऊस बरसला आहे.

बेळगाव परिसरातील 24 तासातील पाऊस मी. मी. मध्ये (कंसात 16 जुलैचा पाऊस) 

बेळगाव : 40 (58.1)
रेल्वे परिसर : 42 (56)
देसूर : 30.6 (34.2)
राकसकोप : 74.7 (83.8)
संतीबस्तवाड : 37 (43.4)
उचगाव : 64.4 (63.3)
सुळेभावी 32.4 (31.2)
सांबरा : 26.9 (34.7)
बागेवाडी 14.4 (20.2)
काकती : 15.2 (8.2) 

24 तासातील पाऊस तालुकानिहाय 

बेळगाव : 28.6 मी. मी.
खानापूर : 51 मी. मी.
चिक्‍कोडी : 26.5 मी. मी.
अथणी : 12 मी. मी. 
बैलहोंगल : 13.1 मी. मी.
गोकाक : 3.8 मी. मी.
हुक्केरी : 16.2 मी. मी.
रामदुर्ग : 1.6 मी. मी.
रायबाग : 10 मी. मी.
सौंदत्ती : 4.5 मी. मी.