Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Belgaon › खानापुरात अवकाळी दमदार

खानापुरात अवकाळी दमदार

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 16 2018 11:53PMजांबोटी : वार्ताहर 

जांबोटी, नागुर्डावाडा, नंदगड, गर्लगुंजी, इदलहोंडसह तालुक्याच्या बहुतेक भागात रविवारी रात्री 10 च्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारपासून तालुक्यासह भागात उष्म्यामध्ये वाढ होऊन उष्म्याने उच्चांक गाठला होता. काही ठिकाणी आकाश ढगांनी व्यापले होते. रविवारी रात्री दहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह तब्बल पाऊण तास दमदार पावसाने हजेरी लावली.
उन्हाळी पिकांना दिलासा मिळाला असून , मशागतीच्या कामांना गती येणार आहे. 

काही प्रमाणात जलस्रोतांंनाही पाणी येणार आहे. दुसर्‍या दिवशी सोमवारीही सकाळपासून गरमी होती. यामुळे अद्यापही अवकाळी शक्यता कायम आहे. 
तालुक्यातील इदलहोंड, गर्लगुंजी, गणेबैल, नंदगडसह तालुक्याच्या काही भागात वीट व्यवसाय चांगल्या प्रमाणात चालतो. गेल्या वर्षीच्या धसक्याने यंदा विटांचा हंगाम लवकर संपवून मशागतीच्या कामात शेतकरी गुंतल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात दोन तर चालू महिन्यात अनेक ठिकाणी तीन-चार वेळा अवकाळीने हजेरी लावली आहे.

यानंतर रविवारी मोठ्या प्रमाणात अवकाळीने हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना व ऊस पिकाला दिलासा मिळाला आहे. पण काजू-आंबा, मिरची, सुक्या चार्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यापुढेही पाऊस झाल्यास त्यात भर पडणार आहे. नंदगड, गर्लगुंजीसह तालुक्यात भातपीक घेणार्‍या भागात मशागतीच्या कामांना जोर आला आहे.  काही ठिकाणची पाणीटंचाई तूर्तास मिटण्याचे चिन्ह 
आहे.

Tags :heavy rain,khanapur,belgaon news