Sat, Jun 06, 2020 18:47होमपेज › Belgaon › आरोग्य विभागाने घेतले मांसाचे नमुने

आरोग्य विभागाने घेतले मांसाचे नमुने

Published On: Mar 07 2018 12:41AM | Last Updated: Mar 07 2018 12:31AMबेळगाव : प्रतिनिधी

ऑटोनगर येथील कत्तलखान्यांमधील मांसाचे नमुने आज आरोग्य विभागानेही घेतले. याआधी पोलिसांनीही नमुने घेऊन ते हैदराबादला पाठवले आहेत. कोल्ड स्टोरेजमध्ये केवळ मांस साठवणूक करण्याची परवानगी आहे; पण स्टोरेजमध्येही जनावरांची कत्तल होते, असा प्राणी दया संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे स्टोरेजमधील मांसाची चाचणी होणार आहे. आज महापालिकेच्या आरोग्य विभागाने नमुने घेतले. त्याचीही चाचणी होणार आहे. सदर मास किती दिवसांपूर्वीचे आहे, हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत कळू शकते. त्यामुळे नमुने हैदराबादला पाठवण्यात आले आहे. मात्र, तो अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

ऑटोनगर परिसरातील कत्तलखान्यांविरुद्ध  दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिस खात्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. या संदर्भात कोल्डस्टोरेज मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर काल्डस्टोरेजमधील जनावरांच्या मांसाचे नमुने आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी व अन्‍नसुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनीही घेतले आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढची 
कारवाई होईल, अशी माहिती आरोग्याधिकार्‍यांनी दिली.