Sun, Apr 21, 2019 00:05होमपेज › Belgaon › होन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला

होन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:15AM

बुकमार्क करा

कारवार : शाळेला निघालेल्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर गुरुवारी सकाळी चाकूहल्‍ला झाला. विद्यार्थिनी जखमी असून, या प्रकाराने होन्‍नावर तालुक्यातील वातावरण पुन्हा तंग झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी 144 कलम लागू केले आहे. 

मागोड (ता.  होन्‍नावर) येथे गुरुवारी सकाळी हा हल्ला झाला. शाळेला निघालेल्या  विद्यार्थिनीला भोसकण्याचा प्रयत्न तिघा युवकांच्या टोळक्याने केला.  मात्र, हल्ल्याची कल्पना येताच विद्यार्थिनीने वार चुकविला आणि आरडाओरडा केला. त्यामुळे लोक जमा झाले आणि हल्लेखोर युवक पसार झाले. ही विद्यार्थिनी मागोड येथील शाळेत सातवीमध्ये शिकत असून, चाकूहल्ल्यात तिच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत.  

हल्ल्याची माहिती गावात कळताच वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण होन्‍नावर तालुक्यात वातावरण तणावपूर्ण बनले असून जिल्हाधिकार्‍यांनी शुक्रवार, दि.15 च्या सकाळपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.