Wed, Jan 16, 2019 11:42होमपेज › Belgaon › चाकूने भोसकून खुनाचा प्रयत्न

चाकूने भोसकून खुनाचा प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहापूर  बसवाण्णा देवस्थानच्या यात्रेदरम्यान धक्काबुक्की झाल्याने एकट्यावर चाकूने हल्ला करून भोसकून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. 26 रोजी रात्री घडली. या प्रकरणी जयेश भातकांडे (रा. टीचर्स कॉलनी, खासबाग) यांनी शहापूर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

बसवाण्णा यात्रेदरम्यान मिरवणुकीत नाचत असताना एकमेकाला धक्का लागल्याने जयेश भातकांडे व राकेश माळवी यांच्यात वादावादी झाली होती. दाणे गल्ली क्रॉसवर मिरवणूक आल्यानंतर राकेश माळवी याने या रागातून जयेश भातकांडे याच्यावर चाकू हल्ला करून भोसकले. यामध्ये जयेश हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी राकेश माळवी याच्याविरोधात शहापूर पोलिसांत दाखल केली आहे तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महेश कुरणकर याच्यावरही काहींनी हल्ला केला आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत. 

याप्रकरणी राकेश माळवीसह अभि बिर्जे, ओंकार बिर्जे, अभी पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून शहापूर पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे.
 


  •