Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Belgaon › स्वामिनाथन आयोग लागू करा

स्वामिनाथन आयोग लागू करा

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 8:33PMगुलबर्गा : वार्ताहर

पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याला केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण कारणीभूत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी केली. शरणबसवेश्‍वर संस्थानच्या जत्रा मैदानावर हैद्राबाद कर्नाटक रयत संघातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात अण्णा हजारे बोलत होते. हजारे म्हणाले, भाजपने सत्तेवर आल्यानंतर स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु मोदी यांचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली तरी शेतकर्‍यांच्या हितासाठी कोणतेही धोरण राबविले नाही. येत्या 23 मार्चपासून रामलीला मैदानावर उपोषण करणार आहे.

कर्नाटक आणि गोवा राज्यादरम्यान चालू असलेल्या म्हादई जलतंटा राजकीय मुद्दा झाल्याने उभय राज्यांतील नेते  स्वार्थासाठी याचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्ञानयोगाश्रमचे श्री सिध्देश्‍वर स्वामी यांच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हैद्राबाद कर्नाटक रयत संघाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील होते. नवी दिल्ली कृषी अनुसंधान संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. एस. ए. पाटील, अ‍ॅड. पी. चेंगलरेड्डी, अभिनव शिवलिंगेश्‍वर स्वामी, श्रीनिवास शिरनूरकर, बसवराज दिग्गांवी, भवानीसिंग, डॉ.नागरत्ना देशमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.