Sun, Nov 18, 2018 09:19होमपेज › Belgaon › फिल्मी स्टाईल हाणामारी

फिल्मी स्टाईल हाणामारी

Published On: Sep 05 2018 2:12AM | Last Updated: Sep 05 2018 2:12AMबेळगाव : प्रतिनिधी

तब्बल 20 विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एका कॉलेज युवकावर मंगळवारी हल्ला केला. कॉलेजरोडवर हॉटेल सन्मानसमोर हा प्रकार घडला. हल्ल्यात विद्यार्थी जखमी असून, हल्लेखोर लगेच फरारी झाले. पवन महाबळेश्‍वर उळागड्डी (वय 20, रा. देवलापूर, ता. बैलहोंगल) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याचा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

सायंकाळच्या सुमारास पवन एकटाच जात असताना अचानक 15 ते 20 मुलांच्या टोळक्याने येऊन त्याला बेदम मारहाण सुरू केली. पवनच्या डोक्याला मार लागला असून तो किरकोळ जखमी  झाला आहे. 

कोणत्या कारणाने आपल्यावर हल्ला करण्यात आला हे समजले नाही, अशी माहिती पवनने पोलिसांना दिली. शिवाय, हल्लेखोर कोण आहेत याचीसुद्धा माहिती नाही, असेही त्याने सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये ही मारामारी प्रेमप्रकरणातून झाली असल्याची चर्चा सुरू होती.