Thu, Jun 27, 2019 11:39होमपेज › Belgaon › शंभर खाटांचा दवाखाना अडकला लालफितीत 

शंभर खाटांचा दवाखाना अडकला लालफितीत 

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:18AMजांबोटी : विलास कवठणकर

तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे विविध रोग, आजारांचा फैलाव वाढला आहे.या तुलनेत आरोग्यसेवा कमी पडत आहे. तालुक्याचे मुख्य आरोग्य केंद्र असलेल्या सरकारी दवाखान्यात विशेष करून प्रसूत महिलांची मोठी गैरसोय होत असल्याने तालुका आरोग्य खात्याकडून विविध आरोग्य सेवा मिळण्यासाठी 100 खाटांच्या दवाखान्याचा प्रस्ताव शासनाकडे दोन वर्षापूर्वी पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. आता नूतन आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी पाठपुरावा केल्यास महिलांची गैरसोय थांबणार असून आरोग्यसेवाही भक्कम होणार आहे.

तालुका दवाखान्यात कमी जागेअभावी सर्वच आजारांवर एकाच वेळी सेवा देणे कठीण जात आहे. यामुळे एका सेवेसाठी पाच-पाच वेळा हेलपाटे मारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यात प्रसूत महिलांना हवी तशी सेवा मिळत नसून फरफट होत आहे. यासाठी तालुका आरोग्य खात्याने अशा महिलांसाठी विशेष 60 खाटांच्या दवाखान्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. यामध्ये भरीव निधीचाही अंदाज स्पष्ट करण्यात आला आहे. याला दोन वर्षे झाली तरी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. 

विनाखर्च आणि आरामदायी सेवा म्हणून मिळण्याच्या आशेने गोरगरीब सरकारी दवाखान्यात दाखल होतात. अलिकडे रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वांनाच वेळेेत सेवा मिळणे कठीण झाले आहे. यात प्रसूत महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना लागणार्‍या सेवा, औषधे, गोळ्या आणि आराम करण्यासाठी तालुका दवाखान्यात जागा अपुरी पडते. बाळंतिणींना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. यात ग्रामीण महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.