Wed, Jul 17, 2019 10:03होमपेज › Belgaon › खासगी अनुदानित शाळाही आरटीईमध्ये

खासगी अनुदानित शाळाही आरटीईमध्ये

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 10:58PMबेळगाव : प्रतिनिधी

खासगी आणि अनुदानित शाळांनाही यंदा आरटीई लागू करण्यात आला असून, त्यामुळे यंदा 15 हजार जागा वाढवून मिळणार आहेत. मागासवर्गीय तसेच आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण हक्‍क कायद्यानुसार यावर्षी 1 लाख 44 हजार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण 25 टक्के जागा आरटीई अंतर्गत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

येत्या 2018-19 शैक्षणिक वर्षाची आरटीई वेळापत्रक शिक्षण खात्याने जाहीर केले आहे. येत्या 20 फेब्रुवारीपासून पालकांनी ऑनलाईन पद्धतीने आरटीई अंतर्गत आपल्या पाल्यांच्या शालेय प्रवेशाकरिता अर्ज सादर करायचे असून 21 मार्च ही अंतिम तारीख आहे. मागीलवर्षी आरटीई अंतर्गत 1 लाख 29 हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळाला होता. यावर्षी खासगी अनुदानित शाळांनाही या प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आहे. 

अतिरिक्‍त 15 हजार जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा अल्पसंख्याक आणि आर्थिक द‍ृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्‍त डॉ. पी.सी.जाफर यांनी दिली.