होमपेज › Belgaon › चन्‍नम्मानगरात वाटमारी

चन्‍नम्मानगरात वाटमारी

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 19 2018 12:33AMबेळगाव : प्रतिनिधी 

चन्‍नम्मानगर दुसरा स्टेज येथे बुधवारी रात्री रविराज रमानंद पै रा. अर्जुन कॉलनी-पार्वतीनगर यांना मारहाण करून त्यांच्याकडील किमती मोबाईल व 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लुटून नेण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी हे कृत्य केले.  बुधवारी रात्रीही रविराज पै जेवणानंतर  चन्‍नम्मानगर बसथांब्याजवळ ते आले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. तसेच खिशातील मोबाईल हिसकावून पोबारा केला.