होमपेज › Belgaon › स्वतंत्र जिल्ह्यासाठी उद्या चिकोडी, गोकाकमध्ये आंदोलन

स्वतंत्र जिल्ह्यासाठी उद्या चिकोडी, गोकाकमध्ये आंदोलन

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 11:38PM

बुकमार्क करा

गोकाक ः वार्ताहर 

गोकाक जिल्हा मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय जिल्हा रचना समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत एकमताने घेण्यात आला. येथील शून्य संपादन मठात मठाधीश श्री  रघराजेंद्रस्वामी यांच्या सानिध्यात माजी मंत्री आ. भालचंद्र जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. शुक्रवार दि. 15 रोजी या मागणीसाठी पुकारण्यात आलेला गोकाक बंद शांततेने पाळण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.  यावेळी ज्येष्ठ नेते बी. आर. पाटील (नागनूर), माजी जि. पं. अध्यक्ष बसगौडा पाटील (कल्लोळी), एम. आर. भोवी, अ‍ॅड. बी. आर. कोप्प, नगराध्यक्ष तळदप्पा, माजी नगराध्यक्ष एस. ए. कोतवाल, सिद्धलिंग दळवाई, रामण्णा हुक्केरी यांनी पक्षपात, मतभेद बाजूला ठेवून हे आंदोलन तीव्र व्हायला हवे, असे मत व्यक्त केले. 

मुरुघराजेंद्रस्वामी आपल्या  म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गोकाक जिल्हा मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यापुढेही मतभेद दूर ठेवून शांततेने प्रभावी आंदोलन सुरू करुया. आंदोलनात जारकीहोळी बंधूंचे नेतृत्त्व मिळाल्यास लवकरात लवकर गोकाक जिल्ह्याचे स्वप्न साकार होईल.

अध्यक्षीय भाषणात आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, गोकाक जिल्हा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत नाही, अशी अफवा विरोधक पसरवत असून हा आरोप धादांत खोटा आहे. येत्या दि. 21 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव जिल्हा दौर्‍यावर येत असून गोकाक जिल्हा रचना समितीच्या नेतृत्त्वाखाली त्यांची भेट घेऊन याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल. 

गोकाक बंद शांततेत पाळण्याचे आवाहन

गोकाक जिल्हा मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय जिल्हा रचना समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत एकमताने घेण्यात आला. येथील शून्य संपादन मठात मठाधीश श्री मुरघराजेंद्रस्वामी यांच्या सानिध्यात माजी मंत्री आ. भालचंद्र जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. शुक्रवार दि. 15 रोजी या मागणीसाठी पुकारण्यात आलेला गोकाक बंद शांततेने पाळण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. 

यावेळी ज्येष्ठ नेते बी. आर. पाटील (नागनूर), माजी जि. पं. अध्यक्ष बसगौडा पाटील (कल्लोळी), एम. आर. भोवी, अ‍ॅड. बी. आर. कोप्प, नगराध्यक्ष तळदप्पा, माजी नगराध्यक्ष एस. ए. कोतवाल, सिद्धलिंग दळवाई, रामण्णा हुक्केरी यांनी पक्षपात, मतभेद बाजूला ठेवून हे आंदोलन तीव्र व्हायला हवे, असे मत व्यक्त केले. मुरुघराजेंद्रस्वामी आपल्या  म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गोकाक जिल्हा मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यापुढेही मतभेद दूर ठेवून शांततेने प्रभावी आंदोलन सुरू करुया. आंदोलनात जारकीहोळी बंधूंचे नेतृत्त्व मिळाल्यास लवकरात लवकर गोकाक जिल्ह्याचे स्वप्न साकार होईल. अध्यक्षीय भाषणात आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, गोकाक जिल्हा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत नाही, अशी अफवा विरोधक पसरवत असून हा आरोप धादांत खोटा आहे. येत्या दि. 21 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव जिल्हा दौर्‍यावर येत असून गोकाक जिल्हा रचना समितीच्या नेतृत्त्वाखाली त्यांची भेट घेऊन याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.