Fri, Sep 20, 2019 04:41होमपेज › Belgaon › गाईची ओटी भरण्याचा हा अनोखा कार्यक्रम(व्‍हिडिओ)

मुलींचं प्रेम.... अन् गायीची ओटी भरण्याचा कार्यक्रम(व्‍हिडिओ)

Published On: Dec 17 2017 7:05PM | Last Updated: Dec 17 2017 7:19PM

बुकमार्क करा

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

कुणी तरी येणार येणार गं, यांसह इतर गाणी गाणाऱ्या महिला,  दुसरीकडे पाहुण्यांनी डोकवरुन शिदोरी आणणाऱ्या महिला,  गाईची ओटी भरणाऱ्या महिला, पंगतीत बसून भोजनाचा अस्वाद घेणारे लोक असे चित्र पहावास मिळाले तालुकतील बेळकुड गांवातील विद्यानगरात

तालुक्यातील बेळकूड येथील विद्यानगरातील गिरी अरभावी दापंत्याला ’मुली’ फार आवडतात पण त्यांना दोन ’मुले आहेत.  मुली व्हाव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होते. पण त्यांना मुली झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना नेहमी आपल्याला मुलगी नसलची खंत होती.  शेवटी गांवातील शेकडो लाकांना निमंत्रीत करुन आपल्या घरातील गाईचे मोठ्या गाजावाजा कर्रींत चोळी काकणाचा कार्यक्रम साजरा केला. 

शास्त्रोक्तपणे गाईला कुंकू लावून, ओटी भरुन, सजवून, साडी नेसविणे अशा प्रकारे एका गाईला माहेरवासीनी समजून चोळी काकणाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमास गांवातील शेकडो लोक उपस्थित होते.

सर्वसामान्यपणे पती पत्नी आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा बाळगून असतात. पण येथे एका दाम्पत्याला मुलगी न झालचे दुख होवू नये म्हणून घरात असलेला गाईचाच चोळी काकणाचा कार्यक्रम करुन आपल्याला मुली नसल्याचे दुख दूर करण्याचे काम केले आहे. 

गिरीमल्लप्पा अरभावी व गौरी अरभावी दांम्पत्याने आपल्या घरातील मुलीप्रमाणे गाईचे पालनपोषण करीत आहेत. या गाईच्या आईचा देखील चोळी काकणाचा कार्यक्रम करणत आला होता. आजच्या काळात अरभावी दांम्पत्याचे गाईबदलचे प्रेम प्रेरणादायी आहे.

 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex