Thu, Aug 22, 2019 10:44होमपेज › Belgaon › अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद

अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद

Published On: Jan 21 2018 2:44AM | Last Updated: Jan 20 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

दुचाकी आणि मोबाईल चोरणार्‍या 7 जणांच्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला मार्केट  पोलिसांनी केली आहे. त्यांच्याकडून 9 दुचाकी आणि 21 मोबाईल जप्‍त करण्यात आले आहेत. एसीपी शंकर मारिहाळ व मार्केट पोलिस निरीक्षक प्रशांत यांनी सापळा रचून 7 चोरट्यांना संशयास्पदरीत्या वावरताना  ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता ते दुचाकी चोरटे असल्याचे निष्पन्‍न झाले. अबू सलाम पाशापुरी (रा. चांदू गल्ली), गुरू शिवबसय्या हिरेमठ (इस्लामपूर, ता. हुक्केरी), पुंडलिक मदन सूर्यवंशी (सदाशिवनगर), खालीद अब्दुल रशिद मालदार (वीरभद्रनगर), महम्मद संकीद अहमद (काकर गल्ली), उबेद युनुस  शेख (खंजर गल्ली) आणि परशराम शिवलिंग गोधी (आंबेडकर गार्डनजवळ) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत.

 त्यांनी 9 दुचाकी आणि 21 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर विविध ठिकाणी चोरी करण्यात आलेल्या 9 दुचाकी आणि 21 मोबाईल संच जप्‍त करण्यात आले. त्यांच्याविरोधात भादंवि  कलम 379, 399 सह कलम 41 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.