Tue, Nov 13, 2018 00:00होमपेज › Belgaon › आ. न्यामगौडांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आ. न्यामगौडांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 30 2018 12:30AMजमखंडी : वार्ताहर

जमखंडीचे आमदार, माजी केंद्रीय मंत्री सिद्दू न्यामगौड यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. तालुक्यातील हिरेपडसलगी-नागनूर येथील जमखंडी शुगर्स कारखान्याच्या आवारात सायंकाळी  4.30 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. आ. न्यामगौड यांचे कार अपघातात सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनाकरिता जमखंडीतील पोलो मैदानातील तालुका क्रीडांगणात ठेवण्यात आले होते.

जनतेचा विश्‍वास व प्रेम संपादन केलेले दुर्मीळ असे व्यक्‍तिमत्त्व सिद्दू न्यामगौड यांचे होते. असा प्रामाणिक नेता हरपल्याने न भरून येणारी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून बोलताना व्यक्‍त केली.

मरण निश्‍चित असले तरी यामधील समाजाकरिता जीवन जगणारी व्यक्‍ती अमर होते व त्या पंक्तीमधील सिद्दू न्यामगौड होते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी व्यक्‍त केली. गदगचे श्री तोंटदार्य महास्वामी, आ. मुरगेश निराणी, एस. आर. पाटील, बसवराज होरट्टी आदींनीही श्रध्दांजली वाहिली. आ. सिद्दू सवदी, बसनगौडा पाटील-यत्नाळ, वीरण्णा चिरंतीमठ, रमेश जिगजिनगी, विजयानंद काशप्पनवर, लक्ष्मण सवदी, श्रीकांत कुलकर्णी, आर. बी. तिम्मापूर, उमाश्री, दोड्डनगौडा पाटील, एम. बी. पाटील, जी. एस. न्यामगौड, बी. बी. चिम्मनकट्टी, यशवंतराय पाटील, एस. आर. पाटील, एस. जी. नंजयनमठ, जगदीश गुडगुंटी, श्रीशैल दळवाई, संगमेश निराणी, ईलाही कंगनोळ्ळी, नझिर कंगनोळी, राजू पिसाळ, श्री गौरीशंकर, श्री जयमृत्युंजय, श्री शिवलिंग शिवाचार्य, डॉ. विश्‍वप्रभू, श्री हर्षानंद, डॉ. चन्नबसव महास्वामी आदी उपस्थित होते.