होमपेज › Belgaon › लोकशाही वाचविण्यासाठी हवा पुढाकार

लोकशाही वाचविण्यासाठी हवा पुढाकार

Published On: Mar 08 2018 8:42PM | Last Updated: Mar 08 2018 8:29PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या देशात अराजकता सदृश स्थिती आहे. हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.  आपल्या देशाची घटना वाचवा, लोकशाही वाचवा आणि भारत वाचवा यासाठी राष्ट्रीय फेडरेशन ऑफ इंडियन वुमन यांच्यातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. महिला आणि युवतींवर अत्याचार करणार्‍यांच्या विरोधात कारवाई  करण्याबरोबरच बेकायदा दारू वाहतूक व इतरांवरही करवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांना त्वरित अटक करण्यात यावी, महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी मंगल नंदीहळ्ळी, अक्कम्मा सिद्धगवळी, माधुरी नेवगिरी, रेणुका पावशे, नंदा गावडे, पार्वती नाईक, मंदा नेवगी व महिला उपस्थित 
होत्या.