Mon, Jul 15, 2019 23:45होमपेज › Belgaon › अपघातात 5 विद्यार्थी ठार

अपघातात 5 विद्यार्थी ठार

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 11:02PM

बुकमार्क करा
गोकाक : वार्ताहर 

चित्रदुर्ग जिल्ह्यातील सीबारा गावाजवळ  राष्ट्रीय महामार्गावर जीपने ट्रकला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातातमध्ये गोकाक तालुक्यातील मुन्याळ, खानट्टी, हळुर व सैदापूर येथील एकूण पाचजणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेले आहेत. सहाजणांना किरकोळ दुखापत झाल्याने  त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 

मृतामध्ये  मुण्याळ गावातील राकेश  बाहुबली चिकोडी हा बी.कॉमचा विद्यार्थी, खानट्टी येथील सिध्दाप्पा पुजारी हा बीएचा विद्यार्थी व  हळुर येथील विनोद कंकणवाडी  हा बीएससीचा विद्यार्थी व सैदापुरचा शिवलिंगा यांचा समावेश आहे. शिवलिंगला नुकतीच नोकरी लागली होती. शनिवारी सायंकाळी जीपमधुन म्हैसूर, मडिकेरी च्या सहलीवर एकूण 13 जण गेले होते. सहल आटपून ते मरळीला येताना सोमवारी पहाटेच्या दरम्यान सदर क्रूझने लोखंडी बार घेऊन जाणार्‍या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला. भीषण अपघातामुळे गोकाक तालुक्यातील खानट्टी, मुन्याळ, हळुर या गावावर दुःखाची छाया पसरली आहे.