Sat, Apr 20, 2019 07:56



होमपेज › Belgaon › निपाणी : पिकअप-टेम्पोचा अपघात, ५ ठार  

निपाणी : पिकअप-टेम्पोचा भीषण अपघात, ५ ठार  

Published On: Jun 25 2018 9:27AM | Last Updated: Jun 25 2018 9:28AM



निपाणी (जि. बेळगाव) : प्रतिनिधी

पिकअप आणि आयशर टेम्पोची धडक होऊन झालेल्‍या अपघातात ५ जण ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खासगी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. निपाणीमधील गांधी रुग्‍णालयासमोरील उड्डाण पुलावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

पिकअपचा टायर फुटल्‍याने पिकअप टेम्‍पोला धडकले, यात ५ जणांचा जागीच मुत्‍यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी दोघे कोल्‍हापूरचे तर तीघे जण बेळगाचे असल्‍याची स्‍थानिकांनी माहिती दिली. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्‍थळी शहर पोलिस दाखल झाले आहेत.