Tue, Apr 23, 2019 13:48होमपेज › Belgaon › उद्यमबागेत प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग 

उद्यमबागेत प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग 

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:41AM

बुकमार्क करा
मच्छे : वार्ताहर

खादरवाडी क्रॉस उद्यमबाग येथील प्लास्टिकच्या बॅगांचे उत्पादन करणार्‍या फॅक्टरीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.

फॅक्टरी मालक उमेश निट्टूरकर हे रात्री 8 वा. च्या सुमारास फॅक्टरी बंद करून घरी गेले होते. अर्ध्या तासानंतर अचानक फॅक्टरीला आग लागली. आजूबाजूच्या कारखानदारांनी निट्टूरकर यांना कळविताच त्यांनी त्वरित फॅक्टरीकडे धाव घेतली. आगीचे वृत्त कळताच अग्‍निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तीन बंबांनी आग आटोक्यात आणली त्याचबरोबर आजूबाजूच्या कारखानदारांनीही मिळेल त्या मार्गाने पाण्याचा मारा करून आग वेळीच आटोक्यात आणण्यास मोलाचे सहकार्य केले. 

उद्यमबाग पोलिस स्टेशनचे सीपीआय पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यास सहकार्य आणि पंचनामा केला.