Mon, Dec 17, 2018 15:18होमपेज › Belgaon › अखेर कपिलेश्‍वर रेल्वे उड्डाण पुलाचे नामकरण

अखेर कपिलेश्‍वर रेल्वे उड्डाण पुलाचे नामकरण

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:36AMबेळगाव : प्रतिनिधी

वर्षभरापासून रखडलेले कपिलेश्‍वर उड्डाणपुलाचे नामकरण मंगळवारी पार पडले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून त्या पुलाचे ‘कपिलेश्‍वर उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात आलेे. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील कपिलेश्‍वर मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्ण होताच त्या पुलाच्या नावावरून स्पर्धा सुरू झाली होती. काहींनी त्या पुलाला छत्रपती शिवरायांचे नाव देण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मनपा सर्वसाधारण बैठकीत या पुलाला कपिलेश्‍वर उड्डाणपूल नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याचबरोबर धारवाड रोड पुलाला छत्रपती शिवरायांचे तर खानापूर रोड पुलाला महात्मा बसवेश्‍वरांचे नाव देण्याचा निर्णय झाला होता. महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंगळवारी  सकाळी  पुलाच्या नामकरणाचा कार्यक्रम पार पडला.