Tue, Mar 26, 2019 08:16होमपेज › Belgaon › बेळगावात मोर्चा दरम्यान किरकोळ दगडफेक

बेळगावात मोर्चा दरम्यान किरकोळ दगडफेक

Published On: Jan 10 2018 2:47PM | Last Updated: Jan 10 2018 3:12PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कोरेगाव भीमाप्रकरण आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या  वक्तव्याच्या निषेध तसेच विजापूरमध्ये एका जातीच्या युवतीवर अत्त्याचार केल्याच्या निषेधार्थ बेळगावात एका समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात समाजातील विविध संघटनांचा समावेश होता. या मोर्चावेळी शहरात एक दोन दुकानांवर किरकोळ दगडफेकीचा प्रकार घडला आहे. 
शहरात आज, एका समाजाच्या विविध संघटनांनी मोर्चाद्वारे निषेध नोंदविण्याचे नियोजन केले होते.  मार्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान काही समाज कंटकांनी एक दोन दुकानांवर किरकोळ दगडफेक केली. त्यामुळे मोर्चाला गालबोट लागले. परंतु, परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.  तसेच काही बसेसवरही किरकोळ दगडफेक करण्यात आली. संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता.