होमपेज › Belgaon › जावयावर हल्‍ला करणार्‍या सासर्‍याला अटक 

जावयावर हल्‍ला करणार्‍या सासर्‍याला अटक 

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 20 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

न्यायालयीन आवारात जावयावर  चाकुने हल्‍ला केलेल्या सासर्‍याला मार्केट पोलिसांनी अटक केली. मार्केट पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. राजन मनोहर काकडे (वय 56 रा. गणपत गल्‍ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारात सदर घटना घडली होती.  कौंटुंबिक न्यायालयात असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी आलेल्या जावई  डॉ. निखिल ढवळे(रा.शिर्शी) याच्यावर दि. 19 रोजी सासरे काकडे यांनी चाकुने वार हल्‍ला केला होता. या प्रकरणी जावई निखिल याने मार्केट पोलिस स्थानकात सासर्‍रा विरोधात तक्रार दाखल केली होती.  यावरुन राजन काकडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन न्यालयासमोर हजर करण्यात आले आहे. 

Tags : Belgaum,. father, law, arrested, attack, son,  law