Thu, Apr 25, 2019 17:57होमपेज › Belgaon › फार्महाऊसच्या आडून अवैध धंदे!

फार्महाऊसच्या आडून अवैध धंदे!

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 26 2018 9:08PMखानापूर: वार्ताहर

तालुक्यात फार्महाऊस संस्कृती झपाट्याने वाढत चालली आहे. निसर्गाच्या कुशीत राहण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी तालुक्यातील खासकरुन पश्‍चिम घाटात जमिनी घेऊन त्याठिकाणी फार्महाऊस उभारले आहेत. मात्र अलिकडे या फार्महाऊच्या आडून अवैद्य धंदे तसेच अनैतिक प्रकार घडत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’, ‘आत येण्यास सक्त मनाई आहे’ असे लिहिलेले बोर्ड टांगून नेहमी सदर परिसरात संशयास्पद हालचाली सुरु असतात. लोकवसतीपासून दूर आणि जंगलात असलेयल्या या फार्महाऊसमध्ये रम रमा आणि रमी फार्मात असल्याची चर्चा होत आहे.

जांबोटी, कणकुंबी, चोर्ला,पारवाड, लोंढा, रामनगर, नेरसा, हेम्मडगा भागात मोठ्याप्रमाणात फार्महाऊस आणि हॉटेल-रिसॉर्ट आहेत. बेळगाव परिसरातील पर्यटकांचा नेहमी या परिसरात मोठा वावर असतो. याआधी निसर्गप्रेमीच याठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असलेले दिसत होते. मात्र अलिकडे या फार्महाऊस परिसरात नशेमध्ये असलले युवक दिसून येतात. तसेच  रात्री अपरात्री संशयास्पद हालचाली सुरु असल्याचेही निदर्शनास येत आहे.    सदर फार्महाऊस बेळगाव परिसरातील उद्योजक, निवृत्त शासकीय अधिकारी तसेच नेत्यांची आहेत. संबंधित ग्रामपंचायतही कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. 

गोवा आणि सिंधुदुर्ग भागातील मटकाबुकी आणि जुगार खेळणार्‍यांनाही अशा फार्महाऊसमध्ये आश्रय मिळत असल्याची स्थानिक नागरिकांतून नेहमी चर्चा होत आहे. तालुका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालविले असल्याने  निसर्गसंपदेने नटलेला आणि सांस्कृतिक वारसा जपणार्‍या तालुक्याला अशा अवैध धंद्यांची लागन झाल्याने भविष्यात गुन्हेगारीची मोठी झळ तालुकावासियांना सोसावी लागणार आहे. त्यामुळे अशा संशयास्पद ठिकाणांवर नजर ठेवून कारवाई करण्याची गरज आहे.

वनक्षेत्रात अतिक्रमण

जांबोटी आणि कणकुंबी भागातील काहीण फार्महाऊस मालकांनी वनक्षेत्रातील जागेत अतिक्रमण केले आहे. पश्‍चिम घाटातील टेकड्या, धबधबे आणि नद्या-नाले आदी पर्यटनस्थळांवरही पर्यटकांना जाण्यासाठी मज्जाव करुन त्याठिकाणीही  अतिक्रमण केले आहे.  वर्षानुवर्षे कसत असणार्‍या कुमरी जमिनीमध्ये शेती करणार्‍या शेतकर्‍यांवर  वनखाते  वारंवार कारवाईचा देत त्रास करते. मात्र धनदांडग्यांच्या या अतिक्रमनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे

पर्यावरण प्रेमी आहेत कोठे?

तथाकथित पर्यावरणप्रेमींना जंगलातील रिसॉर्ट आणि हॉटेलकडून मोठ्याप्रमाणात पर्यावरणाच्या नियमांची होत असलेली पायमल्ली दिसत नाही.  परिसरात  टाकण्यात येणारा  घनकचरा वनप्राण्यांना धोकादायक ठरते आहे.  काहीजण शिकारीसाठी बंदूक घेऊन जंगलात फिरताना शेतकर्‍यांच्या निदर्शनास आली आहेत. असे असताना  पर्यावरणप्रेमी आहेत तरी कुठे, असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे.

Tags : Belgaon, farmhouse, illegal, trafficking