Wed, Jul 17, 2019 08:16होमपेज › Belgaon › जिल्ह्यात प्रत्येक किचनमध्ये ‘थेट गॅस’

जिल्ह्यात प्रत्येक किचनमध्ये ‘थेट गॅस’

Published On: Jun 29 2018 12:08AM | Last Updated: Jun 28 2018 8:53PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रत्येक घरातील स्वयपाक घरांपर्यंत थेट गॅस पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काळात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरात घरोघरी पाईपच्या माध्यमातून नैसर्गिक गॅस पुरवठा केला जाईल.  येत्या पंधरा दिवसांत हा गॅसपुरवठा सुरू होईल. त्यामुळे गॅससाठी होणारी गृहिणींची परवड कायमची मिटणार आहे.

बेळगाव जिल्हा घरोघरी गॅस पुरवठा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर 25 वर्षासाठी हैद्राबाद येथील मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रचर कंपनीच्यावतीने राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बेळगाव शहराला गॅस पुरवठा होणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या अथवा  प्रारंभ होणार असून यासाठी कंपनीकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेच.

सुरवात रामतीर्थनगरपासून रामतीर्थनगरला 200 घरांना पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा होणार आहे. बसवनकोळमध्ये याबाबतची यंत्रणा उभारण्यात येत आहे. गेल कंपनीकडून दाभोळ ते बंगळूर या गॅस वाहिनीतून मुख्य केंद्राला गॅस पुरवठा होणार आहे. तेथून  शहरातील वेगवेगळ्या भागात गॅसची मुख्य वाहिनी घालण्यात आली आहे. सध्या रामतीर्थनगर ते हॉटेल संकम, सम्राट अशोक चौक, संगोळी रायण्णा चौक, राणी चन्‍नम्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक ते व्हीटीयू, चन्नम्मा ते एपीएमसी, शाहू नगर परिसर, हनुमान नगर, सह्याद्री नगर भागात गॅस वाहिनी घालण्यात आलेली आहे. 

60 हजार जोडण्यांचे उद्दिष्ट

शहरात सप्टेंबर महिन्यापर्यंत किमान 4 हजार गॅसजोडण्या देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मार्च 2019 पर्यंत शहरात सुमारेे 30 हजार जोडण्या करण्यात येतील. तर डिसेंबर 2919 अखेरपर्यंत 60 हजार जोडण्या करण्यात येणार आहेत.

सुरुवातीच्या काळात मनपाकडून प्रतिसाद लाभला नाही. यामुळे वाहिन्या घालण्याच्या कामाला विलंब झाला. मात्र सध्या मनपासह केआयएडीबी, बुडा, सार्वजनिक बांधकाम खाते यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. यामुळे प्रकल्प लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.