होमपेज › Belgaon › निपाणीत वीज मंडळाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

निपाणीत वीज मंडळाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

Published On: Mar 01 2018 11:35AM | Last Updated: Mar 01 2018 12:03PMनिपाणी : प्रतिनिधी

वीज मंडळाच्या अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना समोर आली आहे. बसवराज ऐनापुरे असे आत्‍महत्‍या केलेल्‍या अधिकाऱ्याचे नाव आहे. बसवराज हे निपाणी कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्‍हणून कार्यरत होते. त्‍यांनी आपल्‍या राहत्‍या घरी गळफा घेऊन आत्‍महत्‍या केली.

याबाबत अधिक माहिती अशी, बसवराज शहर व ग्रामीण भागात वीज मीटर रिडिंगचे काम करीत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांची निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती. बुधवारी संध्याकाळी त्‍यांनी आत्‍महत्‍या केली असून, गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली. 

वाचा : पतीचा खून झाल्यानंतर पत्नी गप्प का?

स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानुसार बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे फौजदार आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना बसवराज यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये,‘‘अधिकाऱ्यांसह कामाचा त्रास आणि पाठीचे दुखणे सहन न झाल्‍याने आपण आत्‍महत्‍या करत असल्‍याचा उल्‍लेख आहे. 

दरम्‍यान, या बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.