Wed, Nov 21, 2018 03:24होमपेज › Belgaon › मार्चनंतर भारनियमन!

मार्चनंतर भारनियमन!

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:21AM

बुकमार्क करा

बंगळूर : राज्यासमोर दगडी कोळशाची समस्या गंभीर बनली असून मार्चनंतर राज्यावर भारनियमनाचे संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याला सध्या 9617 मे.वॅट विजेचा पुरवठा होत आहे. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा अधिक आहे. निवडणुकीचा काळ जवळ आल्यानंतर केंद्राकडून दगा मिळणार की काय, अशी भीती सत्तारुढ सरकारला लागली आहे. केंद्राच्या वीज ग्रीडमधून राज्याला 1750 मे.वॅट वीज वितरण करण्यात येत असली तरी आणखी काही विजेची मागणी केंद्राकडे होत आहे. दरम्यान, जलविद्युत प्रकल्पाद्वारे प्र्रतिदिनी 23 दशलक्ष युनिट वीज उत्पादित केली  तरी जून अखेरपर्यंतच जलाशयातील पाण्याचा साठा पुरेल.  मात्र, विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी 30 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करणे आवश्यक आहे.