Mon, Mar 25, 2019 05:00
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रचाराचे बिगुल

नाट्य परिषदेच्या निवडणूक प्रचाराचे बिगुल

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 9:01PMबेळगाव : प्रतिनिधी

अ. भा. नाट्य परिषदेच्या मुंबई कार्यकारिणीसाठी 4 मार्च रोजी निवडणूक होत आहे. बेळगावातून बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर, उपाध्यक्ष राजू सुतार व नाट्यकर्मी वृषाली मराठे या तिघांमध्ये रस्सीखेच आहे. तिन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे.

काही वर्षांत बेळगावात मराठी नाटकांचे प्रयोग कमी झाले आहेत. ते वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. परिषदेच्या मुंबई कार्यकारिणीसाठी प्रतिनिधी स्वरुपात विविध विभागातून 60 जण निवडले जाणार आहेत. त्यासाठी वीणा लोकूर, राजु सुतार व मराठे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. 4 मार्च रोजी शहापूर येथील सरस्वती वाचनालयात मतदान होईल. परिषदेच्या बेळगाव शाखेचे 517 मतदार आहेत. 

नाट्य परिषदेकडे पाठपुरावा करून यापुढेही बरेच काही करायचे आहे, या आश्‍वासनासह लोकूर परिषदेच्या सदस्यांशी संपर्क साधत आहेत. आजवर केलेल्या कार्याचा दाखला देऊन स्थानिक कलाकारांना वाव देण्याचा प्रयत्न करत राहणार असल्याचे सुतार सांगतात.

 

बेळगावच्या नाट्य चळवळीत आपला नेहमीच सहभाग राहिला आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच परिषदेचे उपक्रम आणि योजना राबविण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे मराठे म्हणतात.