होमपेज › Belgaon › शैक्षणिक साहित्य दरात ६ टक्क्यांनी वाढ

शैक्षणिक साहित्य दरात ६ टक्क्यांनी वाढ

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 8:03PMबेळगाव : प्रतिनिधी

शाळाना सुरवात झाली असून यंदा जीएसटी लागू केल्यामुळे साडेसहा टक्क्याने शैक्षणिक साहित्य महागले आहे. गतवर्षी साडेपाच टक्के कर होता. तो यंदा जीएसटी आकारल्याने 12 टक्क्यावर पोहचला आहे. यामुळे पालकांच्या खिशाला कात्री बसली आहे.

शैक्षणिक साहित्य खरेदीला वेग आला असून शाळेतून यादी दिल्याप्रमाणे पालकवर्ग बाजारात गर्दी करीत आहे. 100 पानी लहान वह्यांचा डझनाचा दर 240 ते 300 रुपयापर्यंत आहे. 200 पानी मोठ्या वह्याचा डझनाचा दर 360 ते 420 पर्यंत आहे. मोठ्या आकाराच्या वह्यांचे दर 300 रुपये 100 पानी तर 540 रुपये 200 पानी वह्यांचा दर  आहे. किरकोळ 100 पानी वहीची विक्री 20 रुपये एक याप्रमाणे करण्यात येत आहे. 200 पानी एक वही 30 रुपये आहे. मोठ्या आकाराची 100 पानी वहीची किरकोळ विक्री 20 रुपये तर 200 पानी 45 रुपये आहे. 

खाकी कव्हरला मागणी

प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रत्येक विषयाच्या वहीला खाकी कव्हर आवश्यक असल्याचा दंडक असल्याने खाकी कव्हरला चांगली मागणी आहे. 30 ते 90 रुपयांपर्यंत खाकी कव्हर शैक्षणिक साहित्य विक्री करणार्‍या दुकानात उपलब्ध आहे.