होमपेज › Belgaon › मोटारसायकल झाडावर आदळून युवक ठार

मोटारसायकल झाडावर आदळून युवक ठार

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 30 2017 12:21AM

बुकमार्क करा
दड्डी : वार्ताहर       

मोटारसायकलवरून क्रिकेट   स्पर्धेसाठी जाताना  ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याकडेला  झाडावर वेगाने आदळल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी गुडगनट्टी क्रॉस येथे घडली. अपघातात मोटारसायकलवरील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.  मृताचे नाव मंजुनाथ सुभाष गोंधळी (वय 18, रा. हत्तरगी) असे असून जखमींची नावे रमेश दुंडाप्पा बसर्गी (18) व सागर नाईक (19) अशी आहेत. गुडगनट्टी येथील स्पर्धेसाठी हे तिघेही तरुण हिरोहोंडा स्प्लेंडरवरून हत्तरगीहून गुडगनट्टी येथे जात असताना हा अपघात  घडला.