Tue, May 21, 2019 12:17होमपेज › Belgaon › बंगळूर शहरात ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

बंगळूर शहरात ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 21 2018 11:36PMबंगळूर : प्रतिनिधी 

बंगळूर शहरात आफ्रिकन देशातील ड्रग तस्करांचा धुमाकूळ सुरू असून नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशेनातही हा विषय गाजला. त्यानंतर सजग झालेल्या पोलिसांनी शहरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या 25 ड्रग्ज तस्करांना शनिवारी अटक केली. हे तस्कर नायजेरिया आणि युगांडाचे नागरिक आहेत. 

शनिवारी सकाळी पोलिसांच्या सहा पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले. या ड्रग्ज तस्करांकडून त्यांचे पासपोर्ट, व्हिसा, वास्तव्य परवाना संदर्भातील कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. 

काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्याविरुद्ध पासपोर्ट अ‍ॅक्ट, फॉरेनर्स अ‍ॅक्ट आणि फॉरेनर्स ऑर्डर अ‍ॅक्टखाली कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. मंजुनाथनगर येथे राहणार्‍या स्टॅन्ले (27) यास अटक करून त्याच्याकडून 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आली. फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून शहरात बेकायदा आफ्रिकन नागरिक राहत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.