Tue, Feb 19, 2019 20:48होमपेज › Belgaon › बेळगाव : अपघातात परिवहनचा बस चालक जागीच ठार

बेळगाव : अपघातात परिवहनचा बस चालक जागीच ठार

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:50AMबेळगाव ः प्रतिनिधी

ड्युटी संपवून दुचाकीने घरी परतणार्‍या परिवहनचा बसचालक आझमनगर येथे कँटरने धडक दिल्याने जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. मुरली गोपाळ पम्मार (वय 34,  सध्या रा. मार्केट यार्ड ज्योतीनगर, मूळचा कलमाड, ता. रामदुर्ग) असे चालकाचे नाव आहे. 

परिवहन खात्याच्या तिसर्‍या विभागात मुरली चालक होता. सध्या तो विजापूर - बेळगाव मार्गावर एस.टी. चालवत होता. वर्षभरापासून तो येथे कार्यरत होता. शनिवारी दुपारची ड्युटी संपवून मार्केटयार्ड येथील आपल्या  घराकडे जात होता. आझमनगर सर्कलमध्ये मिठाई दुकानात मुलांना काही खाद्यपदार्थ घेऊन दुचाकीवरून जात होता. मागून आलेल्या कँटरने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच  मृत्यू झाला.