बेळगावात रुग्ण नाही म्हणून हयगय नको

Last Updated: Mar 29 2020 10:21PM
Responsive image


बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळत आहेत. अशावेळी महाराष्ट्र व गोव्याची हद्द लाभलेल्या  बेळगाव शहर व जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचाा पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही, हे महत्त्वाचे आहे. परंतु म्हणून बंदोबस्तात हयगय करू नका अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली आहे.

रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. राज्यातील बंगळूर, चिकबळ्ळापूर, कारवार व मंगळूर येथे सर्वाधिक कोरोना चे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्यात सुरुवातीपासूनच जिल्हा व पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त व बाहेरून येणार्‍यांची तपासणी हे सूत्र अवलंबल्याने आतापर्यंत एकही ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनीही बेळगाव जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले आहे. परंतु हे कौतुक करताना पुढील पंधरा दिवस लॉक डाऊन असून या काळातही असाच चोख बंदोबस्त ठेवावा. गोवा तसेच महाराष्ट्रातील लोक जिल्ह्यातील लोक प्रवेश करणार नाहीत याची खबरदारी घ्या, अशी सूचना जिल्हाधिकारी  बोमनहळ्ळी  यांना दिली आहे.

जिल्हा व पोलिस प्रशासनाने लॉक डाऊन ची अंमलबजावणी उत्तमरीत्या सुरू केली आहे दोन दिवसांपूर्वी एपीएमसीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होताना दिसून आले होते.आता डिस्टन्स ठेवून जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्याची सक्त सूचना सर्वांना दिली आहे. बेळगावात कोरोनाबाबत भीतीचे वातावरण असले तरी अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेला नाही .

ते वृत्त चुकीचे

जिल्ह्यात लवकरच बंदोबस्तासाठी मिलिटरी जवान तैनात करण्यात येत असल्याचे वृत्त सगळीकडे पसरली आहे. याबाबत जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी  यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तसे अद्याप कोणतेही संकेत नाहीत. बेळगावातील लोक स्वतःहून लॉकडाऊनचे पालन करत असल्याने त्याची गरज नाही. जनतेने जर लॉकडाऊनचे सातत्याने उल्लंघन केले तर केंद्र व राज्य शासनाकडून याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्‍त केली आहे.
 articleId: "185523", img: "Article image URL", tags: "belgaon, yeddyurappa, corona, ",