Thu, Jan 17, 2019 18:23होमपेज › Belgaon › बेळगाव : भिंतीलाही कान असतात...

बेळगाव : भिंतीलाही कान असतात...

Published On: Feb 02 2018 11:44PM | Last Updated: Feb 02 2018 11:42PMबेळगाव ः प्रतिनिधी

गुरुवारची रात्र अंजनेयनगरातील नागरिकांना धक्कादायक ठरली. डॉ. उमाकांत दंडावतीमठ एक सभ्य गृहस्थ म्हणून शेजार्‍यांना परिचित होते. गुरुवारी रात्री रवीने त्यांच्याशी भांडण केल्यानंतर आरडाओरड करून शेजार्‍यांना जमा केले आणि आपल्या बापाला चोरांनी मारल्याचा कांगावा केला; मात्र शेजार्‍यांना तो पटला नाही.

रवीचे वागणे विक्षिप्त होते.  उमाकांत आणि रवी यांच्यामधील मतभेदांची स्थानिकांना माहिती होती. रवीने पोलिसांनाही बापाच्या खुनाची खोटी माहिती दिली; मात्र शेजार्‍यांचा संशय आणि  पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून रवी सुटला नाही आणि बापाच्या खुनाबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली.

उमाकांत आणि रवी यांच्यात वारंवार खटके उडत, याची स्थानिकांना चांगलीच माहिती होती. मुलगा वळणावर येईल, या आशेने उमाकांत यांनी 5 वर्षांपूर्वी रवीचे  लग्न
 नात्यातील मुलीशी लाऊन दिले.

आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी उमाकांत यांची इच्छा होती. मात्र रवीने शिक्षणही पूर्ण केले नाही. गुरुवारी रात्री भांडण सुरू होताच त्याची कल्पना शेजार्‍यांना आली. काही वेळानंतर वाद विकोपाला गेल्याचा आणी उमाकांत यांच्या ओरडण्याचा आवाज स्थानिकांना आला. काही वेळातच रवी आरडाओरड करु लागला. त्याबरोबर शेजारी त्यांच्या घरी गेले आणि समोरचे दृष्य पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. कारण डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. 

निर्दयी रवीने शेजार्‍यांना आणि पोलिसांना घरात चोरटे शिरले होते आणि त्यांनीच माझ्या बापाच्या डोक्यात सळीने वार केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी बाप-मुलामधील ताणलेल्या संबंधांची चौकशी करून रवीला अटक केली.