Fri, Apr 26, 2019 18:22होमपेज › Belgaon › उ.कर्नाटकात संमिश्र

उ.कर्नाटकात संमिश्र

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:29PMबंगळूर : प्रतिनिधी

कडकडीत बंद पाळण्यात आलेल्या बंगळूरसह काही जिल्ह्यांत  वाहतूक व्यवस्था, व्यापार,  बाजारपेठ, शिक्षणसंस्था, खासगी संस्था बंद राहिल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. बंगळुरातील मल्लेश्‍वरम, अव्हेन्यू रस्त्यासह काही भागात आंदोलकांनी हॉटेल, दुकानावर दगडफेक केल्याने नुकसान झालेे. बंगळूर वगळता अन्य भागात कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत झाला आहे.

बंदमुळे बाहेर न पडता घरामध्येच बसणे पंसद केल्याने बंगळूर शहरातील प्रशासकीय केंद्रे म्हणून ओळखल्या जाणार्‍या विधानसौध, विकाससौध यांसह अन्य काही महत्त्वाची कार्यालये, बँकांमधून कर्मचार्‍यांची कमतरता होती. 

सरकारी शाळा? महाविद्यालयांना सुट्टी देणे न देण्याचा निर्णय संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांवर परिस्थितीनुरूप सोपविण्यात आला होता. त्यामुळे काही जिल्ह्यात सरकारी शाळा?महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरूच होती. बंगळूर, तुमकूर, चिक्‍कमंगळूर, दावणगिरी, मंगळूर, यादगिरी आदी जिल्ह्यांमध्ये कन्‍नड संघनांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरल्या.