Tue, Jul 16, 2019 23:58होमपेज › Belgaon › विकासापेक्षा मायबोली महत्त्वाचीच

विकासापेक्षा मायबोली महत्त्वाचीच

Published On: Mar 01 2018 1:57AM | Last Updated: Mar 01 2018 1:57AMजांबोटी : वार्ताहर

कर्नाटक सरकारकडून सीमाबांधवांवर कानडी भाषा लादली जात आहे, तर राष्ट्रीय पक्षांकडून विकासाची भाषा केली जात असली तरी मायबोली टिकवणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. आजपर्यंतच्या समिती आमदारांकडून संस्कृतीबरोबर विकास साधण्यात आला आहे. खानापूर हे त्याचे उदाहरण आहे, असे उद्गार आज सीमामेळाव्यात मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी काढले.
जांबोटीत बुधवारी पार पडलेल्या सीमा मेळाव्यात तालुक्यातील तीन हजारहून अधिक सीमाबांधव उपस्थित होते. कक्केरी, बिडी, नंदगड, जांबोटी, कणकुंबी, बैलूर भागातून मोठ्या संख्येने सीमाबांधव आले होते. अध्यक्षस्थानी जांबोटीचे सीमा त्यागी शंकर देसाई होते.

मेळाव्याच्या सुरुवातीला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयजयकारने परिसर दणाणूून सोडण्यात आला. त्यानंतर जिल्हा आणि तालुक्यातील दिवंगत सीमा सत्याग्रहींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संजय मोरे यांना  शिवसंत ही उपाधी मिळाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. समिती नेते राजेंद्र मुतगेकर यांनी समितीच्या पाठीशी राहण्याची सर्वांना शपथ दिली.