Thu, Jul 18, 2019 02:57होमपेज › Belgaon › बिजगर्णीत डेंग्यूने घेतला बळी

बिजगर्णीत डेंग्यूने घेतला बळी

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 04 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी

डेंग्यूची लागण झाल्याने युवकाचा  मृत्यू झाल्याची घटना बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे घडली. पुंडलिक वामन भाष्कळ (42) असे त्याचे नाव आहे. पुंडलिक सेंट्रिंगचे काम कंत्राट घेऊन करीत होता. बांदा (सावंतवाडी) येथे तो कामाला गेला होता. तो दहा दिवसांपासून आजारी होता. त्याने स्थानिक खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. रक्षाबंधनसाठी गावाकडे तो आला होता. मात्र, ताप कमी न झाल्याने रविवारी (दि. 2) त्याला केएलईमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्‍न झाले. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, 2 मुले, विवाहित मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. 

डेंग्यूमुळे बिजगर्णीत घबराट पसरली आहे. गावात राकसकोप येथून पाण्याचा पुरवठा होतो. जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे. तेथून पाणी गढूळ पाणी झिरपते. यामुळे गावातील अनेक लोक आजारी पडत आहेत. ग्राम पंचायतीला कळविण्यात आलेे.  मात्र अजूनही दुरुस्ती झाली नाही. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

पश्‍चिम भागात बेळगुंदीचे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद आहे. तेथे सुविधा नाहीत. पंचायतीमार्फत गटारी साफ करावी, औषध फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून ग्रा.पं. अध्यक्षा भारती कांबळे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

गावात डेंग्यूची साथ नाही. हा युवक कामानिमित्त बाहेर होता. तेथेच त्याला डेंग्यूची लागण झाली. यासाठी गावात योग्य ती काळजी घेतली जाईल. 
- कल्याणी, पीडीओ, बिजगर्णी